अमरावती : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण. अनेक रंग, रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येकजण गुंतून जातो. मात्र, या उत्सवात सर्वाधिक इजा होणारा अवयव म्हणजे डोळा. प्रत्येकवर्षी फटाक्यांमुळे शेकडो अपघात घडतात. त्यात अनेकांना कायमचे दृष्टीदोष, दुखापत किंवा अंधत्वाचा सामना करावा लागतो. एक छोटीशी चूक आयुष्यभराचा अंधार देणारी ठरू शकते. असं होऊ नये, यासाठी डोळ्यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन नेत्रतज्ज्ञांकडून केले जात आहे. फटाक्यांमधून येणारे रसायन, धूर, आणि प्रकाश डोळ्यांसाठी किती घातक आहेत? डोळ्यांना इजा झाल्यास काय करावं? याबाबत माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. राजोरिया यांनी दिली आहे.