अमरावती: अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिल्याशिवाय होत नाही. चहा घेतल्यानंतरच शरीराला ताकद मिळते असंही अनेकजण म्हणतात. पण, जास्त चहा पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त चहा पिणाऱ्यांनी काही बाबी लक्षात घेऊनच चहाचे सेवन करायला पाहिजे. चहामुळे पित्ताचा त्रास जास्त होतो. तसेच विविध समस्या देखील उद्भवू शकतात. चहा पिताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.