बीड , प्रतिनिधी सुरेश जाधव : बीडच्या कडा गावातील गुरू शिष्यांच्या प्रेमळ नात्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त होऊन शाळा सोडून जात असताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थ्याचं हे प्रेम पाहून मुख्याध्यापकांनाही गहिवरून आलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय.