सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड : बीडच्या शिरूर तालुक्यातील खालापुरी शिवारात एक हरीण विहिरीत पडले होते. सकाळी या भागात शेतकरी आल्यानंतर त्यांनाही बाब लक्षात आली. ग्रामस्थांनी दोरीच्या मदतीने त्या हरणाला बाहेर काढत जीवदान दिले. बाहेर काढल्यानंतर हरीण जखमी नाही याची खात्री करत त्याला सोडून देण्यात आले.