
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंबेफळ येथील अनिल शेळके हे दुधापासून तयार होणाऱ्या तूप, दही, श्रीखंड, लस्सी यासह विविध पदार्थांचे स्वतः उत्पादन घेतात. त्यांच्याकडे दूध संकलन केंद्र देखील आहे. शेळके यांनी सन 2020 मध्ये विघ्नहर्ता गोविन या नावाच्या उत्पादनाची निर्मिती केली. तसेच त्यांचे पदार्थ महाराष्ट्रासह परदेशात देखील विक्री केले जातात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची वर्षाला जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची उलाढाल होत असून खर्च वजा करून एकूण निव्वळ कमाई 10 ते 12 लाख रुपये वर्षाकाठी मिळत असल्याचे शेळके यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.