छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात कारभारी शेळके हे मेंढी पालन व्यवसाय गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहे. मेंढी पालनाचा व्यवसाय वडिलोपार्जित असून शेळके यांच्याकडे 200 गावरान मेंढी असून ती बारा महिन्यातून 2 वेळा पिल्लांना जन्म देते. तसेच ते मेंढ्यांची विक्री करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून ते महिन्याला 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत तर वर्षाला 10 ते 15 लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळवतात.