सहकारी साखर कारखान्यांबाबतच्या कर्जाला हमी देण्याच्या सरकारच्या धोरणांवर कायमच टीका होत आली आहे. आता पुन्हा एकदा राज्य सरकारने राजकीय पुढाऱ्यांच्या 5 कारखान्यांना शिखर बँकेने दिलेल्या 631 कोटी रुपयांची हमी घेतली आहे. यातील बहुतांश कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे आहेत.