मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत काही ठराव करण्यात आले. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला वेळ द्यावा असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मनोज जरांगेंनी सरकारच्या भूमिकेवर सवाल केलाय तसेच आंदोलनावर ठाम असल्याचं सांगितलं त्यामुळे हा तिढा सुटण्याची चिन्हं काही दिसत नाही.