ज्ञानेश्वर साळोखे : चिमुकल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी ते बराच वेळ रस्त्यावर वाट पाहात थांबले होते. कनेरी मठ येथून बाहेर पडल्यानंतर हायवे जवळ या मुलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी थांबवली. बऱ्याच वेळापासून ही मुलं त्यांना भेटण्यासाठी वाट पाहत होते. या मुलांचं अप्रूप पाहून मुख्यमंत्री भारावून गेले.