ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूरचं संकट अजूनही टळलं नाही, धोका कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट 11 इंचावर स्थिरावली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोल्हापुरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. आज कोल्हापुरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहराच्या सखल भागात रात्रीपासून पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातले 95 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. याची ड्रोन दृश्यं न्यूज18 मराठी च्या हाती आली आहेत शुभम अंजणेकर या तरुणाने ही दृश्यं आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केली आहेत.