कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्निल कुसाळेने पदक पटकावताच गावकऱ्यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचं म्हटलं होतं. स्वप्निल कुसाळे गावी पोहोचताच गावकऱ्यांनी कौतुक करत त्याची हत्तीवरून जंगी मिरवणूक काढली. गावकऱ्यांच्या प्रेमामुळे स्वप्निल कुसाळे भारावून गेला.