शेकापच्या मेळाव्यात दोन मोठ्या पक्षाचे नेते एकाच मंचावर दिसले. यावेळी राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर शेजारी शेजारी बसलेले होते. संजय राऊत राज ठाकरे यांच्या कानात काहीतरी सांगत असल्याचंही दिसत आहे. या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे.