शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला काल मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं. त्यामुळे चिपळूणच्या वाशिष्टी नदीला पूर आला. पुराचे पाणी चिपळूण बाजारपेठेत शिरलं. चिपळूणचा नवा बाजारपुल देखील पाण्याखाली जातोकी काय अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. याच चिपळूणची पूरस्थिती किती भयावह होती. चिपळूणचा फोटोग्राफर अराफत बेबल याने ही दृश्यं ड्रोन कॅमेऱ्यात टिपली आहेत.