सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील तरुण शेतकरी ओंकार चौरे यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती. पण या पावसामुळे कांदा पाण्याखाली केल्याने कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.