
मुंबईत महापौर कोणाचा ? हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातच आता भाजप-सेनेत महापौरसाठी रस्सीखेच चालू आहे. शिंदेंनी सेनेच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच भाजपला ठाकरे मदत करणार का हा ही एक प्रश्न आहे. त्यातच आता सत्तेसाठी भाजप अकोट सारखा प्रयोग करणार का याकडेही सर्वांचं लक्ष आहे. जर असं झालं तर दोन्ही सेनेची मोठी कोंडी होईल असं म्हटलं जातं. भाजप कोणता पर्याय निवडणार ते अजून समोर आले नाही.