पुणे:महाराष्ट्रात अनेक शेतकरी कर्जबाजारीपणा, नापिकी आणि सतत होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्या करतात. एखाद्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्या कुटुंबावर काय वेळ येते हे शब्दात मांडण्याच्या आणि सांगण्याच्या पलीकडचं आहे. आपल्याकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या की हळहळ व्यक्त केली जाते. आणि हा प्रश्न फक्त सरकारवर सोडून दिला जातो. मात्र काही व्यक्ती अशाही असतात, ज्या फक्त हळहळ व्यक्त न करता या सगळ्यावर कृती करतात आणि त्या कुटुंबांचा आधार बनतात.परभणी जिल्ह्यातील एक उच्चशिक्षित आयटी तरुण, ज्याला महिन्याला दोन लाख रुपयांची नोकरी होती, पण त्याने ती नोकरी सोडली आणि महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा मायबाप बनला. आज आपण त्याच्या या कार्याविषयी जाणून घेणार आहोत.