
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना भवनात उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. तेव्हा मनसे नेते अमित ठाकरे म्हणाले, "तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे. तर कार्यकर्त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे. कारण कुणीही एबी फॉर्म गिळले नाहीत.कुणीही मारामारी केली नाही. ही खरी निष्ठा. आताच्या राजकारणात हे कमी पाहायला मिळतं."