
ठाणे : कुरकुरीत, रसरशीत आणि गोड जिलेबी सर्वांनाच आवडते. घरात शुभकार्य असल्यावर वाटण्यासाठी असो किंवा कोण्या पाहुण्यांकडे जाताना गोड काही द्यायला असो या रसरशीत जिलेबीला प्रधान्य दिलं जातं. ठाण्यात मिळणारी जिलेबीही खवय्यांसाठी पर्वणीच आहे. ठाण्यात 127 वर्ष जुनं असणारे मुंबादेवी जलेबीवाला हे जिलेबीचे दुकान प्रसिद्ध आहे. शुद्ध तुपात तळल्या जाणाऱ्या या जिलेब्या ठाणेकर खवय्ये आवडीने खातात.
Last Updated: October 31, 2025, 15:29 ISTमुंबई : मलई पेढे, बर्फी, मिठाई, शुद्ध तूप आणि दही हे दुग्धजन्य पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत. हे पदार्थ जिथे शुद्ध मिळतात त्या ठिकाणी तर लोकांची गर्दीच होते. दादरकरांची अशीच गर्दी दादर स्थानकासमोर असणाऱ्या सामंत ब्रदर्स या मिठाईच्या दुकानासमोर होते. सामंत ब्रदर्स हे मिठाईचे दुकान गेले 91 वर्ष म्हणजेच 1933 पासून दादरमध्ये आपले शुध्द तूप, लस्सी आणि मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. सामंत ब्रदर्स यांच्या दुकानात मिळणारे पियुष हे पेय दादरकरांचे सर्वात आवडीचे पेय आहे. इथे हे पिण्याकरिता अनेकांची गर्दी होते.
Last Updated: October 31, 2025, 15:03 ISTसोलापूर : सोलापुरी जेवणाच्या ताटात तुम्हाला इतर पदार्थांबरोबर तीन पदार्थ निश्चित दिसतील. ते पदार्थ म्हणजे ज्वारीची भाकरी, शेंगादाण्याची चटणी आणि मिरचीचा ठेचा. घराघरात असणारा हा मेनू जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीची ओळख बनला आहे. सोलापूर- पुणे महामार्गावरील विविध हॉटेल या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. पण या पदार्थांना कोंडीच्या नसले बंधूनी ब्रँड बनवले आहे. आज नसले बंधूंची शेंगा चटणीबरोबर इतर उत्पादने देशातील अग्रेसर मॉलमध्ये विकले जात आहेत. परदेशातही या शेंगा चटणीची चव चाखली जाते.
Last Updated: October 31, 2025, 14:38 ISTनाशिक : आपली मराठी भाषा जशी वळणावळणावर बदलते, तसा चटणीचा ठसकाही वाटा-वाटांवर बदलतो. कारण राज्याच्या विविध भागांमध्ये विविध मसाले वापरले जातात. ते बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसंच प्रत्येक जिल्ह्याचा खास पदार्थही जगभरात लोकप्रिय आहे. जसं की, मुंबईचा वडापाव आणि नाशिकची मिसळ.
Last Updated: October 31, 2025, 14:06 ISTमुंबई : सकाळच्या घाईगडबडीत कमी वेळेत चविष्ट काहीतरी बनवायचं असेल, तर घराघरात आता ब्रेड रोल्सचीच चर्चा सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा कुरकुरीत आणि स्वादिष्ट पदार्थ झटपट तयार होतो आणि चवीलाही भारी लागतो. ह्याचे साहित्य देखील कमी आहे. ब्रेड रोल्स कशी बनवायची याची माहिती जाणून घेऊया.
Last Updated: October 31, 2025, 13:30 IST