डोंबिवली : डोंबिवलीत एका 4 वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी केडीएमसी (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलीला वेळेत आणि योग्य उपचार मिळाले नाहीत. इतकंच नाही, तर मुलीला पुढील उपचारासाठी ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं, पण त्यासाठी अॅम्ब्युलन्सचीही सोय करण्यात आली नाही