
नाशिक : गरोदरपणाचा काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा काळ असतो. पण डिलिव्हरीसाठी नेमका उत्तम काळ कोणता याचे उत्तर मात्र बऱ्याच स्त्रियांना माहीत नसते. कोणी म्हणतं उन्हाळा चांगला, कोणी म्हणतं पावसाळा चांगला, तर कोणी म्हणतं हिवाळा. पण हे मात्र खरं आहे की यापैकी कोणता तरी एकच ऋतू चांगला असतो आणि तो ऋतू म्हणजे हिवाळा होय. हो मंडळी, डिलिव्हरीसाठी हिवाळा हा अतिशय चांगला काळ मानला जातो. हा काळ जरी गरोदरपणासाठी चांगला असला तरी गरोदर स्त्रीने या काळात काही काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. गरोदर महिलांनी हिवाळ्यात काळजी कशी घ्यावी? याबद्दलचं नाशिक येथील स्त्रीरोग तज्ज्ञ प्रशांत महाजन यांनी माहिती सांगितली आहे.