पुणे : शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत असून, नवरात्री म्हटली की गरबा आणि दांडियाशिवाय सण अपूर्णच मानला जातो. पारंपरिक पद्धतीने देवीची आराधना करत गरब्याचे ताल धरले जातात. त्यामुळे आजच्या तरुण पिढीपासून ते महिलांपर्यंत सर्वांनाच गरबा शिकण्याची उत्सुकता आहे. पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये व वसाहतींमध्ये खास गरबा शिकवण्याचे वर्ग सुरू झाले असून, या वर्गांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे.