रायचंद शिंदे, पुणे : शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत असताना खासदार अमोल कोल्हे, जयंत पाटील, रक्षा खडसे आणि मेहबुब शेख हे थोडक्यात बचावले. क्रेनमध्ये उभा राहिल्यानंतर ते वरती जात असताना क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाला. यामुळे ट्रॉली एका बाजूला तिरकी झाली. यावेळी ट्रॉलीतील चौघांनी एकमेकांना सावरलं आणि तातडीने क्रेन खाली घेतल्यानं सगळे सुखरुप खाली उतरले.