
पुणे : पुण्यातील मंदाकिनी परांजपे यांच्या भरतकाम आणि पेंटिंग क्लासेसला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने राजा रवि वर्मा कलादालन येथे विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 100 रुपयांपासून ते 1 लाखापर्यंतच्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती गिरिजा परांजपे यांनी लोकल18 ला दिली आहे.
Last Updated: November 18, 2025, 19:16 ISTमुंबई: सध्याच्या काळात मराठी तरुण विविध उद्योगांत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मुंबईतील 22 वर्षीय यश मोरे याने परफ्यूम उद्योगात एक ब्रँड सुरू केला आहे. अनेक महागड्या परफ्यूम सारखा परफ्यूम 'मायरसा' ब्रँड अगदी कमी किमतीत देतो. 30 ते 32 हजार किमतीचा डेलिना एक्सक्लुझिफ (Delina Exclusif) परफ्यूम सारखा 20 मिली परफ्यूम यश केवळ 400 रुपयांत देतोय. त्यामुळे हा युवा उद्योजक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
Last Updated: November 18, 2025, 20:29 ISTवर्धा: आपल्याकडे एखादा कार्यक्रम, विवाह सोहळा यांच्या निमंत्रण पत्रिका खूप आकर्षक बनवल्या जातात. पण नंतर या पत्रिका कचऱ्यातच जातात. पण याच पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून खास वस्तू बनवून आपलं घर सजवता येऊ शकतं. वर्धा येथील कलाकार निखिल सुशीला मोरेश्वर यांनी याच पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून आकर्षक फ्लॉवर पॉट कसा बनवायचा? हे दाखवलं आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची ही कल्पना आपल्यालाही नक्कीच आवडेल.
Last Updated: November 18, 2025, 19:57 ISTपुणे: व्यवसाय करावा, स्वतःचं काहीतरी उभं करावं. हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण त्या स्वप्नात परंपरेची जोड, गावागावात हरवत चाललेल्या कलेला नवसंजीवनी आणि शेकडो कुटुंबांना रोजगार या तिन्ही गोष्टी एकत्र साधणं दुर्मिळच. पुणे जिल्ह्यातील नीरज बोराटे यांनी मात्र हे अशक्य वाटणारं शक्य करून दाखवलं. इंजिनिअरिंग पूर्ण केलेल्या या तरुणाने 2016 साली ‘घोंगडी.कॉम’ नावाने व्यवसाय सुरु केला. प्रारंभी फक्त दोन कारागीरांसोबत सुरू झालेल्या या उपक्रमाने आज तब्बल 350 पेक्षा जास्त कारागीरांना रोजगार दिला आहे. महाराष्ट्रापासून आसामपर्यंत आणि भारतापासून अमेरिकेपर्यंत https://www.ghongadi.com/ चा प्रवास देशासह विदेशात पोहोचला.
Last Updated: November 18, 2025, 18:39 ISTछत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या प्रणिता कुलकर्णी गेल्या 13 वर्षांपासून 'पुष्कर गृह उद्योग' चालवत आहे. प्रत्येक सीझननुसार त्या वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि विक्री करतात. हिवाळ्यामध्ये डिंकाच्या लाडूसह विविध पदार्थ मिळतात. लग्नसराईमध्ये सर्व पदार्थ तसेच नवरात्रीमध्ये उपवासाचे पदार्थ असे सीझननुसार पदार्थ बनवतात. या व्यवसायाच्या माध्यमातून कुलकर्णी यांची वर्षाला 15 लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. तसेच त्यांनी 3 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी 'लोकल 18' दिली.
Last Updated: November 18, 2025, 17:37 IST