सांगली: दिवाळीच्या संपूर्ण फराळापैकी चिवडा हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा पदार्थ असतो. अनेक सुगरणी दिवाळीच्या फराळामध्ये दोन ते तीन प्रकारचे चिवडे बनवतात. चिवडा बनवण्याच्या अनेक पद्धती आपल्याकडे आहेत. आज आपण सांगलीच्या सुगरणींनी बनवलेली चिवड्याची खास रेसिपी पाहणार आहोत. खमंग आणि कुरकुरीत अशी चिवड्याची रेसिपी सांगलीच्या प्रसिद्ध उद्योजिका शोभा पाटील यांनी सांगितली आहे