छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील पैठण रोडवरील गेवराई येथे गणेश तागडे हा तरुण 4 वर्षांपासून नाश्ता सेंटर चालवत आहे. विघ्नहर्ता आप्पा वडेवाले म्हणून या नाश्ता सेंटरचे नाव असून त्यांच्याकडे वडापाव, मिसळपाव, भजी यासह विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. पैठण, चितेगाव यासह विविध भागातून खवय्ये त्यांच्याकडे नाश्त्यासाठी येत असतात. त्यामुळे 1 हजार ते बाराशे वडापाव दररोज विक्री होतात. या नाष्टा सेंटरच्या माध्यमातून तागडे यांची दररोज 30 हजार रुपयांपर्यंत उलाढाल होत असते, तसेच महिन्यासाठी खर्च वजा निव्वळ नफा दीड ते 2 लाख रुपयांपर्यंत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय.