नॉस्ट्राडेमस हा सोळाव्या शतकातील फ्रान्सचा एक भविष्यवेत्ता होता, ज्याने अनेक पुस्तकांमध्ये आपली गूढ भाकितं केली होती, जी आजच्या शतकात खरी ठरत आहेत. आता ब्राझीलमधील एथॉल सोलोम नावाची व्यक्तीही अशीच भविष्यवाणी करते. त्याने आधीच ब्रिटीश राजघराण्याच्या आजच्या समस्यांचा अंदाज लावला होता. जगातील अनेक लोक त्याला जिवंत नॉस्ट्राडेमस म्हणतात. त्याने एप्रिलमध्ये येणाऱ्या मोठ्या संकटाबाबत सांगितलं आहे.
advertisement
या मंदिरात 'नरकाचा दरवाजा', इथं जो जातो त्याचा होतो मृत्यू; अखेर त्याचं रहस्य उलगडलं
एप्रिलमध्ये काय आहे संकट?
जिवंत नॉस्ट्राडेमसच्या दाव्यानुसार, सूर्याचं कोरोनल मास इजेक्शन होणार आहे. याला सीएमई असंही म्हटलं जातं. सीएमई हे सूर्यापासून निघणारे प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्रांचे स्फोट आहेत. यात सूर्यापासून चुंबकीय किरणोत्सर्ग थेट पृथ्वीकडे येतो. यामुळे पुढील महिन्यात पृथ्वीवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे.
काय होणार परिणाम
सीएमईमध्ये पृथ्वीची संचार यंत्रणा, विद्युत नेटवर्क आणि उपग्रह नष्ट करण्याची क्षमता आहे. सूर्याकडून येणाऱ्या सीएमई, प्लाझ्मा आणि चुंबकीय लहरींनी उपग्रह जगतातील काही भागांच्या पॉवर ग्रीडवर आधीच कहर केला आहे. पण यावेळी संपूर्ण सूर्यग्रहणासारखी परिस्थिती असेल, असा सोलोमचा दावा आहे. या व्यक्तीचा दावा आहे की पुढील महिन्यात सूर्यप्रकाशातील किरणांमुळे तीन दिवस अंधार निर्माण होईल. 8 एप्रिल 2024 रोजी CME मुळे संपूर्ण सूर्यग्रहण होईल ही शंका खरा करण्यासाठी परिस्थिती बदलत असल्याचे दिसतं आहे.
या समुद्रकिनाऱ्यावर आहे 'चमत्कारिक घंटा'; जी पूर्ण करते सर्व इच्छा
सोलोमनं डेली स्टारला सांगितलं की, पुरावे स्पष्ट होत आहेत आणि एआय वापरून संशोधनाने या प्रकरणाचा गांभीर्याने आणि काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे.
(सूचना - हा लेख माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठी या दाव्याचं समर्थन करत नाही किंवा तो खरा ठरेला याची शाश्वती देत नाही.)