या समुद्रकिनाऱ्यावर आहे 'चमत्कारिक घंटा'; जी पूर्ण करते सर्व इच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
घंटा म्हटलं तर ती मंदिरात असते. पण ही घंटा कोणत्या मंदिरात नाही तर समुद्रकिनाऱ्यावर आहे. जी पाहण्यासाठी लोक दूरदूरहून येतात.
नवी दिल्ली : आजवर तुम्ही अशा बऱ्याच मंदिरांबाबत ऐकलं असेल जिथं देवाच्या मूर्तीसमोर प्रार्थना केल्यानंतर इच्छा पूर्ण होते. पण एक अशी चमत्कारिक घंटाही आहे जी इच्छा पूर्ण करते असा दावा केला जातो आहे. आता घंटा म्हटलं तर ती मंदिरात असते. पण ही घंटा कोणत्या मंदिरात नाही तर समुद्रकिनाऱ्यावर आहे.
समुद्रकिनारे त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखली जातात. परंतु धार्मिक महत्त्व असलेल्या कोणत्याही खास समुद्रकिनाऱ्याबद्दल तुम्ही ऐकलं आहे का आणि लोक तिथं शुभेच्छा देण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी जातात, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? अशी एक जागा आहे.
ब्रिटनच्या वेल्शक बीच हे असंच ठिकाण आहे जिथं एक जादुई घंटा आहे. ही घंटा पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येतात. इथं एक छोटी लपलेली इमारत आहे. जे सेंट गोवनचं प्रार्थनास्थळ आहे. सेंट गोवनचे मंदिर हे दक्षिण पेम्ब्रोकशायरच्या बोशरस्टोनमधील सेंट गोवन शिखराच्या शिखरावर बांधलेली एक साधूची झोपडी आहे. सहाव्या शतकात ते इथं राहत होते. त्यांच्या सन्मानार्थ तेराव्या शतकात हे प्रार्थनास्थळ बांधण्यात आलं.
advertisement
जादुई घंटेची कथा
या छोट्याशा खडकाळ इमारतीशी अनेक प्रकारच्या लोककथा जोडलेल्या आहेत. यामध्ये जादुई घंटा, समुद्री डाकू, काही मिथक, पायऱ्यांचा समावेश आहे ज्यांची संख्या वेळेनुसार बदलते.
अशीही एक कथा आहे की एके दिवशी सेंट गोवनचा समुद्री लुटारूंनी पाठलाग केला. तेव्हा लुटारू थकून परत जाईपर्यंत ते एका लहान खडकाळ खाडीत लपून राहिले. आज याच ठिकाणी प्रार्थनास्थळ आहे. तेव्हापासून, संत गोवन तेथे दगडांमध्ये राहू लागले आणि जेव्हा जेव्हा लुटारू परत येत तेव्हा जवळच्या लोकांना सावध करण्यासाठी जादूची घंटा वाजवत असत.
advertisement
कथेनुसार, लुटारूंनी जादूची घंटा चोरण्याची योजना देखील आखली आणि ते यशस्वी झाले, परंतु त्यांचं जहाज वादळात बुडालं. ज्यानंतर देवदूतांनी ती परत मिळवली. सेंट गोवनला घंटा परत मिळाल्यावर ती पुन्हा चोरीला जाऊ नये म्हणून ही घंटा एका मोठ्या खडकाच्या आत ठेवण्यात आली होती.
आजही घंटा पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. ही घंटा मनोकामना पूर्ण करते असंही म्हणतात. इतकंच नाही तर या पूजा कक्षाच्या पायऱ्यांबद्दल असंही म्हटलं जातं की जेव्हा कोणी त्यांची मोजणी करतो तेव्हा त्यांची संख्या बदलते. पण हे सर्व असूनही हे एक अतिशय सुंदर आणि आकर्षक पर्यटनस्थळ मानलं जातं.
advertisement
(सूचना - हा ले ख सर्वसामान्य माहितीलर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी या दाव्याला समर्थन देत नाही किंवा त्याची खातरजमा करत नाही.)
Location :
Delhi
First Published :
March 23, 2024 9:48 AM IST