सोलापूर : सोलापूर शहरातील होम मैदानावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदाचे 54 वे कृषी प्रदर्शन आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील संतोष पवार यांचा चार पायांचा कोंबडा प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. सोन्या नाव असलेल्या कोंबड्याला तब्बल चार पाय आहेत.
मकर संक्रातीच्या एक महिन्या अगोदर सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरा समोर असलेल्या होम मैदानात कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. या कृषी प्रदर्शनात सातारा जिल्ह्यातील फलटण येथून चार पायांचा कोंबडा दाखल झालेला आहे. संतोष परशुराम पवार यांचा तो कोंबडा आहे. त्याचे नाव सोन्या आहे. सोन्याला चार पाय आहेत. चार पायामधून दोन पायांचा उपयोग करतो. ज्यादा दोन पाय आहेत,परंतु त्यामुळे सोन्याला कसलीही अडचण नाही, असं संतोष पवार यांनी सांगितलं.
advertisement
चायना झिंग सुलतान सोलापुरात, बोकड पाहण्यासाठी होतेय गर्दी, का आहे खास?
चार पायांचा सोन्या धष्टपुष्ट आहे. सहा महिन्यांत त्याचे वजन तब्बल दोन किलो भरले आहे. सहा महिन्याचा पिल्लू असताना,त्याला एका आठवडी बाजारातुन विकत घेतले होते. चार पाय असल्या बाबत काहीही माहिती नव्हते. सोन्या नेहमी खाली बसत होता,त्यावेळी लक्षात आले,त्याला चार पाय आहेत. त्यानंतर सोन्याची भरपूर काळजी घेत त्याची वाढ करत संगोपन केले.
सोशल मीडियावर चार पायांच्या कोंबड्याचे व्हिडीओ प्रसारित करताच,एका कंपनीने त्याची 9 हजार रुपयांत मागणी केली. इतर कोंबड्या प्रमाणे सोन्या सर्व क्रिया करत असल्याने त्याचे उत्पादन वाढवणार असल्याची माहिती संतोष पवार यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.