बुधवारी एका ब्रिटीश नागरिकाचे अवशेष त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले. यासह आतापर्यंत एकूण 258 मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "फक्त एकच मृतदेह आमच्याकडे आहे , ज्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
अहमदाबाद प्लेन क्रॅशचं लव्ह कनेक्शन? प्रेमात वेड्या झालेल्या आयटी गर्लचा प्रताप
advertisement
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रवाशाची ओळख पटलेली नाही तो भारतीय नागरिक आहे, कारण विमानातील सर्व 52 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकाची ओळख पटली आहे. अपघातातील एकमेव वाचलेल्या व्यक्तीचं नाव विश्वासकुमार रमेश आहे .
गंभीरपणे जळालेल्या मृतदेहांमधून डीएनए काढण्याचा प्रयत्न फॉरेन्सिक तज्ज्ञ करत आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, "आम्ही कुटुंबाला जवळचा मार्ग दाखवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहोत . शेवटच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
भारताचे Shubhanshu shukla अंतराळात, पण तिथं करणार काय? Axiom 4 Mission भारतासाठी किती महत्त्वाचं?
एनएद्वारे 253 लोकांची ओळख पटवणं हा एक विक्रम आहे. सर्व ओळख आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली आहे. राज्य आरोग्य विभागाने असा दावा केला आहे की इतक्या कमी वेळात आली आहेत जेणेकरून मृतांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार आणि भरपाईची प्रक्रिया पूर्ण करता येईल.