बंगळुरूतील चंदपुरा रेल्वे पुलाजवळील ही घटना. होसुर मेन रोडजवळ रेल्वे ट्रॅकवर एक सुटकेस पडली होती. निळ्या रंगाची ही सुटकेस. याबाबत पोलिसात माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी बॅग उघडून पाहिली आणि त्यांना धक्काच बसला.
कारण बॅगेत कोणतं सामान नाही तर एक मृतदेह होता. एका तरुणीचा मृतदेह. पोलिसांनी तिचं वय अंदाजे 18 वर्षे सांगितलं आहे. तिच्याबाबत इतर कोणतीही माहिती नाही. तिचं ओळखपत्र नाही किंवा तिचं कोणतंही वैयक्तिन सामान सापडलेलं नाहीये.
advertisement
भाड्याचं घर पाहायला जायचे नवरा-बायको, बोलायचे फक्त 4 शब्द, निघून जाताच ढसाढसा रडायचा घरमालक
प्रथमदर्शनी पाहता तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह बॅगेत भरून तो चालत्या ट्रेनमधून फेकला असावा, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
पुण्याच्या तरुणीचा बंगळुरूत बॅगेत सापडला मृतदेह
बंगळुरूमध्ये मार्चमध्येही अशाच एका बॅगेत महिलेचा मृतदेह सापडला होता. पुण्याची ही महिला जिची बंगळुरूत हत्या करून मृतदेह बॅगेत भरण्यात आला. गौरी खेडेकर असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे.
एका सापाला मारलं, समोर अचानक उभे राहिले 50 साप, शेतकऱ्याच्या घरात भयंकर प्रकार
हत्येच्या एक महिनाआधी ती पती राकेश खेडेकरसह बंगळुरूला शिफ्ट झाली होती. तिच्या पतीनचे तिची गौरीची निर्घृण हत्या केल्याचं तपासात समोर आलं. त्याने तिच्या शरीराचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले आणि राहात्या घरातून फरार झाला. आरोपीनं घरमालकाला फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर घरमालकाने पोलिसांना फोन करून ही माहिती दिली, यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.