महात्मा बुद्धांचं मूळ नाव राजकुमार सिद्धार्थ असं होतं. लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा ते वेगळे होते. लहानपणीसुद्धा ते खोडकर नव्हते. उलट त्यांचा स्वभाव शांत आणि गंभीर होता. ते खूप कमी बोलत असत. बहुतांश वेळ ते एकांतात बसून चिंतन करत असत. गौतम बुद्ध जसजसे मोठे होऊ लागले, तसा त्यांचा स्वभाव आणखी गुंतागुंतीचा होता गेला. हळूहळू गृहस्थ जीवनाबद्दलची त्यांची आवडही कमी होऊ लागली. त्यांचा विवाह झाला आणि त्यांना पुत्रप्राप्तीसुद्धा झाली; पण बुद्धांमधली वैराग्य भावना दिवसेंदिवस वाढत होती. असंच एक दिवस बुद्धांनी कोणाला काहीही न सांगता गृहत्याग केला.
advertisement
का गृहत्याग केला गौतम बुद्धांनी?
अपरिग्रहानंतर आत्म्याच्या जवळ जाण्यासाठी लोक आपापल्या क्षमतेनुसार संपत्तीचा त्याग करतात. परिग्रह म्हणजे संपत्ती जवळ केल्यानं आत्म्याच्या जवळ जाता येत नाही आणि आध्यात्मिक आनंद मिळू शकत नाही. आयुष्यात ज्ञानप्राप्ती करणं हे काही जणांचं ध्येय असतं. असे लोक अपरिग्रह स्वीकारतात. म्हणजेच आत्म्याखेरीज त्यांना अन्य कोणाच्याही म्हणजेच, घर, कुटुंब, संपत्ती आणि अन्य कोणतीही प्रिय वस्तू यांच्या जवळ जाता येत नाही. बुद्धांच्या गृहत्यागाचं कारणही हेच होतं. ते फक्त आपल्या आत्म्याच्या जवळ जाऊ इच्छित होते.
बुद्धांची तपस्या
बुद्धांच्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्या उत्तरांच्या शोधार्थ त्यांनी तपस्या सुरू केली. अनेक वर्षांच्या तपस्येनंतरही त्यांना याची उत्तरं मिळू शकली नाहीत. तेव्हा ते एका वृक्षाखाली जाऊन बसले आणि सत्य जाणल्याशिवाय इथून उठायचं नाही, असा संकल्प त्यांनी केला. याच वृक्षाला आता बोधिवृक्ष या नावानं ओळखलं जातं. याच वृक्षाखाली बुद्धांना पूर्ण आणि दिव्य ज्ञानप्राप्ती झाली होती. अशाच प्रकारे ज्ञान, सत्य यांच्या शोधार्थ बुद्धांना सहा वर्षं लागली आणि 35व्या वर्षी सिद्धार्थ हे गौतमऐवजी महात्मा गौतम बुद्ध झाले.