TRENDING:

रात्रभर मोबाईल पाहून झोपला, सकाळी उठल्यानंतर आला असा मेसेज, वाचताच किंचाळला

Last Updated:

Dream11 Winner : सकाळी उठल्यानंतर त्याला मोबाईलवर एक मेसेज दिसला. हा मेसेज पाहिल्यानंतर तो मोठ्याने किंचाळला. त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. असं हा मेसेज कसला होता हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : रात्री मोबाईल बघून झोपण्याची सवय अनेकांची असते. अशाच सवयीने एका तरुणाचं नशीब बदललं आहे. रात्रभर मोबाईल पाहून तो झोपला आणि सकाळी उठल्यानंतर त्याला मोबाईलवर एक मेसेज दिसला. हा मेसेज पाहिल्यानंतर तो मोठ्याने किंचाळला. त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. असं हा मेसेज कसला होता हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील हे प्रकरण. एका तरुणाचे नशीब एका रात्रीत बदललं आहे. मंगल प्रसाद असं या तरुणाचं नाव. मंगल हापूरमधील एका प्लायवूड उत्पादन कंपनीत काम करतो. मंगलने काही महिन्यांपूर्वी ड्रीम11 वर एक टीम बनवण्यास सुरुवात केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून तो ड्रीम 11 वर एक संघ बनवण्याचं आणि जिंकण्याचं स्वप्न पाहत होता. अखेर त्याचं स्वप्न पूर्ण झालं.

advertisement

हळदीच्या रात्री नाच नाच नाचली नवरी, नंतर टॉयलेटला गेली, मागोमाग गेली आई, दृश्य पाहून हादरली

29 एप्रिल रोजी मंगलने ड्रीम 11 वर एक टीम तयार केली आणि 39 रुपये गुंतवले आणि तो करोडपती झाला. पंजाब आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यात मंगल प्रसादने कोट्यवधी रुपये जिंकले. त्याने थोडेथोडके नव्हे तर 4 कोटी रुपये जिंकले. मंगल करोडपती झाल्याची बातमी गावात पसरली तेव्हा लोक त्याचं अभिनंदन करण्यासाठी आले. मंगलला जिंकलेल्या रकमेतून फक्त 2 कोटी 80 लाख रुपये मिळतील, उर्वरित 30 टक्के रक्कम करातून कापली जाईल.

advertisement

काय आहे ड्रिम11?

क्रिकट हे भारतीयांच्या रक्तात भिनलेलं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत गल्ली-गल्लीत तुम्हाला क्रिकेट लव्हर्स पाहायला मिळतील. त्यात सध्या IPL सुरु आहे आणि भारतीयांसाठी तो अगदी जवळचा विषय आहे.  पण आता लोक फक्त सामने पाहात नाही, तर ते Dream 11 सारख्या fantasy apps वर टीम बनवून पैसेही जिंकू लागलेत. लोक आपल्याकडे असलेल्या क्रिकेटच्या माहितीचा आणि थोडं डोकं वापरुन या ऍप्सवर टिम बनवून पैसे जिंकत आहेत.

advertisement

यासाठी फक्त त्यावेळी सुरु असलेल्या मॅचमधील दोन टीमपैकी कोणतेही प्लेइंग इलेव्हन्स घेऊन टीम बनवायची असते आणि आपल्या आवडीचा कॅप्टन आणि वाइस कॅप्टन ठेवायचा असतो. या ऍपवर कमीत कमी पैशांपासून जास्तीत जास्त पैसे देखील लावता येतात. लोकांनी इथून थोड्या अधीक प्रमाणात पैसे जिंकले आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांनी आपलं नशिब बदललं आहे. त्यांनी या खेळात कोट्यवधी जिंकले आहेत.

advertisement

Dream 11 वर 3 कोटी जिंकले, त्यावर किती टॅक्स लागेल? बँकेत किती रक्कम शिल्लक राहिल?

पण तुम्हाला माहितीय का की तुम्ही कोणतीही लॉटरी जिंकली किंवा कुठेही पैसे तुम्हाला पैसे लागले तर तुम्हाला भारतात त्याचा टॅक्स भरावा लोगतो. याचाच अर्थ जिंकलेली रक्कम कधीच पूर्ण हातात येत नाही. अशावेळी प्रश्न उपस्थीत रहातो की मग जर ड्रीम 11 वर कोणी 1 कोटी जिंकले किंवा अगदी 3, 4 कोटी जिंकले तर त्यांच्या बँकेत किती पैसे येतील?

Dream11 वरून रवी कुमार नावाच्या युवकाने काही दिवसांपूर्वी 3 कोटी रुपये जिंकले. पण त्याच्या खात्यात प्रत्यक्षात जे रुपये आले त्याचा आकडा ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. त्याने जिंकलेल्या 3 कोटींवर आधी 30% TDS म्हणजेच 90 लाख रुपये थेट कापले गेले. उरलेले 2 कोटी 10 लाख उतरतात. पण हे एवढ्यावरच गोष्ट संपत नाही. जुलै महिन्यात जेव्हा Income Tax Return फाईल करावं लागतं, तेव्हा त्याला 27 लाख रुपये अजून भरावे लागतील. म्हणजे सगळं मिळून रवीच्या हातात 1 कोटी 83 लाख रुपयेच राहतात.

मराठी बातम्या/Viral/
रात्रभर मोबाईल पाहून झोपला, सकाळी उठल्यानंतर आला असा मेसेज, वाचताच किंचाळला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल