गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिनची पत्नी निकोल शेनेहन हिचं हे दुसरं लग्न. व्यवसायाने वकील असलेली शेनेहनने 2011 मध्ये टेक इन्व्हेस्टर क्रांझसोबत डेटिंग सुरू केली होती. यानंतर दोघांनी ऑगस्ट 2014 मध्ये लग्न केलं. पण क्रांझने शेनेहान आणि ब्रिन यांचे मेसेज वाचले होते. यानंतर दोघांमधील संबंध बिघडले. लग्नानंतर अवघ्या 27 दिवसांनी क्रांझने फसवणुकीचा दावा करत कोर्टात केस दाखल केली.
advertisement
स्वतःच्या कंपनीत हवा तसा पगार घेऊ शकत नाही एलन मस्क; जादा सॅलरी करावी लागणार रिटर्न कारण...
शेनेहानने नंतर स्वतःला इजा करण्याची धमकी दिली. शेनेहानच्या आग्रहापुढे क्रांझला झुकावं लागलं आणि घटस्फोटाची साधी केस दाखल केली. यामुळे दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले. लग्नानंतर 27 दिवसांनी हे नातं तुटले.
2018 साली शेनहान आणि ब्रिनचं लग्न पण कोरोना काळात दुरावा
शेनहाननं दुसरं लग्न केलं ते ब्रिनशी. 2018 साली दोघांचं लग्न झालं. यानंतर कोरोना संसर्गाच्या काळात जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करावे लागलं. यामध्ये सर्वसामान्यांपासून विशेषांपर्यंत सर्वांनाच कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावं लागलं. अमेरिकाही त्याला अपवाद नव्हता. ब्रिन आणि शेनेहान यांनाही कोरोना लॉकडाऊन दरम्यान आव्हानांना सामोरं जाव लागलं. लॉकडाउन संपल्यानंतर शेनेहान ब्रीनशिवायच कुठेही जाऊ लागली.
एलन मस्कशी वाढली जवळीक
एलन मस्क हे गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांच्या ओळखीतील एक होते. निकोलनं तिची वाढदिवसाची पार्टी दिली होती, या पार्टीत मस्कही आले होते. डिसेंबर 2021 मध्ये मियामीमध्ये एका खाजगी पार्टीदरम्यान निरोल आणि एलन पुन्हा एकदा भेटले. 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या वृत्तानुसार, मियामीमधील त्या पार्टीत मस्क आणि शानेहान कित्येक तास गायब होते. यानंतर शानेहानने पती ब्रिनला मस्कसोबत शारीरिक संबंध असल्याचं सांगितलं.
आईस्क्रीम खाणाऱ्या या गोंडस मुलाला ओळखलंत का? आज आहे जगातील सर्वात श्रीमंत माणूस
मियामी पार्टीच्या दोन आठवड्यांनंतर ब्रिन आणि शेनेहान एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर ब्रिनने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. ब्रिन आणि शानेहान यांचा गेल्या वर्षी कायदेशीर घटस्फोट झाला.