स्वतःच्या कंपनीत हवा तसा पगार घेऊ शकत नाही एलन मस्क; जादा सॅलरी करावी लागणार रिटर्न कारण...
- Published by:Priya Lad
Last Updated:
एलन मस्क यांच्या पगाराबाबत कोर्टात याचिका दाखल झाली. यानंतर कोर्टानं त्यांना दणका दिला आहे.
नवी दिल्ली : नोकरी करायची म्हणजे पगारासाठी मारामार असते. हवा तसा पगार मिळत नाही. त्यापेक्षा आपली कंपनी असावी, आपण बॉस असलो की आपल्याला पगारही आपल्या मनासारखा... असंच अनेकांना वाटतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल कित्येक कंपन्यांचे मालक असलेले एलन मस्क स्वतःच्या कंपनीत हवा तसा पगार घेऊ शकत नाही. त्यांना मिळालेली जादा सॅलरी रिटर्न करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
टेस्ला आणि स्पेस-एक्सचे संस्थापक एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. मस्कने टेस्ला बोर्डाला त्यांच्यासाठी नवीन वेतन पॅकेज तयार करण्यास सांगितलं होतं. या अंतर्गत त्यांनी कंपनीतील आपली भागीदारी 13 वरून 25 टक्के करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर टेस्लाच्या बोर्डाने मस्कच्या नवीन वेतन पॅकेजला मान्यता दिली. हे वेतन पॅकेज 55 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 45,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
advertisement
जगातील क्वचितच कोणत्याही उद्योजकाकडे एवढे मोठे पॅकेज असेल. हे पॅकेज ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात समाविष्ट असलेल्या 500 अब्जाधीशांपैकी 475 अब्जाधीशांच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. जगातील सर्वोच्च 22 अब्जाधीशांकडे इलॉन मस्कच्या पॅकेजपेक्षा जास्त संपत्ती आहे. . फोर्ब्सच्या रिअलटाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, सध्या जगात केवळ 26 लोक आहेत ज्यांची एकूण संपत्ती 45 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारतात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे गौतम अदानी यांची संपूर्ण संपत्ती या पॅकेजपेक्षा जास्त आहे. मस्कच्या नेटवर्थमध्ये ई-कार कंपनी टेस्लाचा हिस्सा सर्वात मोठा आहे.
advertisement
पाच वर्षांपूर्वी काही भागधारकांनी मस्क आणि टेस्लाच्या संचालक मंडळावर कॉर्पोरेट मालमत्ता नष्ट केल्याचा आरोप केला होता. याशिवाय मस्कवर स्वत:ला बेकायदेशीरपणे श्रीमंत बनवल्याचाही आरोप होता. एलन यांचं पॅकेज थांबवण्यासाठी शेअरहोल्डर्सनी कोर्टात धाव घेतली. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. शेअरहोल्डरच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, टेस्लाने मस्कसाठी पॅकेजचा निर्णय घेण्यापूर्वी वाटाघाटीचं खोटं ढोंग केलं होतं. यासाठी कंपनी बोर्डाने कोणत्याही भागधारकाचा सल्लाही घेतला नाही. टेस्लाने भागधारकांची दिशाभूल करून एलन मस्कचा फायदा करण्याचा प्रयत्न केला आहे. मस्कचे वेतन पॅकेज ठरवणारे कंपनी संचालक स्वतंत्र नाहीत. मस्कसोबत त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे मस्कने आपल्या इच्छेनुसार पॅकेजच्या अटी निश्चित केल्या आणि प्रचंड पॅकेज मंजूर करून घेतले. मात्र, मस्कच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
advertisement
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मस्कच्या पॅकेजला स्थगिती दिली. पाच वर्षांनंतर मस्क यांच्या प्रचंड वेतन पॅकेजवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना अमेरिकन कोर्टाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने सांगितलं की, मस्क टेस्लाकडून 55 अब्ज डॉलर्स म्हणजे 45,100 कोटी रुपये पगार घेऊ शकत नाही. असं केल्याने शेअरहोल्डर्सचं नुकसान होऊ शकतं. कोर्टाने अतिरिक्त पगार कंपनीला परत करण्याचे आदेशही दिले
Location :
Delhi
First Published :
February 03, 2024 7:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
स्वतःच्या कंपनीत हवा तसा पगार घेऊ शकत नाही एलन मस्क; जादा सॅलरी करावी लागणार रिटर्न कारण...