आईस्क्रीम खाणाऱ्या या गोंडस मुलाला ओळखलंत का? आज आहे जगातील सर्वात श्रीमंत माणूस
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे कोण कधी व्हायरल होईल काही सांगू शकत नाही.
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामुळे कोण कधी व्हायरल होईल काही सांगू शकत नाही. मोठमोठे सेलिब्रिटीही आपल्या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. असाच एक चिमुकल्या मुलाचा फोटो व्हायरल होतोय. तुम्ही या चिमुकल्याला ओलखलंत का? आज आहे जगातील सर्वात श्रीमंत माणूस. हा फोटो व्हायरल होताच इंटरनेटवर एकच चर्चा रंगलीय.
व्हायरल होत असलेला हा गोंडस चिमुकला दुसरा तिसरा कोणी नसून एलोन मस्क आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचं नाव येतं. लहानपणी ते फारच गोंडस होते आणि त्यांनी त्यांच्या लहानपणीचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Ice cream yum so good pic.twitter.com/HcpTDwIsYk
— Elon Musk (@elonmusk) October 3, 2023
advertisement
एलोन मस्कने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांचा हा फोटो शेअर केला. काहीच वेळात त्यांचा हा फोटो इंटरनेटवर खळबळ माजवताना दिसला. फोटोमध्ये ते आईस्क्रिम खाताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येताना पहायला मिळत आहेत. त्यांनी ही पोस्ट 3 ऑक्टोबर रोजी शेअर केली मात्र आजपर्यंत पोस्टची चर्चा होत असून कमेंटचा वर्षाव होत आहे.
advertisement
दरम्यान, एलोन मस्क यांच्या पोस्टने खळबळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांची प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून हेडलाईन्स बनत आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून एलॉन मस्क कायमच चर्चेत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2023 1:40 PM IST
मराठी बातम्या/Viral/
आईस्क्रीम खाणाऱ्या या गोंडस मुलाला ओळखलंत का? आज आहे जगातील सर्वात श्रीमंत माणूस