काही वेळा बॉस क्षुल्लक कारणावरून सर्वांसमोर कर्मचाऱ्याला रागावतो. काही लोक तर चूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरूनही काढतात. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसची तक्रार कंपनीत केली, त्यानंतर कर्मचाऱ्यालाच नोकरीवरून काढून टाकलं; मात्र त्यानंतर असं काही घडलं की कंपनीला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
चीनमधल्या शांघायमधल्या एका कंपनीतलं हे प्रकरण आहे. शांघायमधल्या एका महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्याचं कारण असं, की तिने तिच्या बॉससाठी नाश्ता खरेदी करण्यास नकार दिला. लू असं आडनाव असलेली ही महिला कर्मचारी अलीकडेच एका शैक्षणिक संस्थेत नोकरीला लागली होती. तिच्या बाबतीत तिथे जे घडलं, ते पाहून लोक भडकले. त्यानंतर कंपनीला मागे हटावं लागलं.
advertisement
या महिलेने तिच्या बाबतीत घडलेला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितला आहे. लू ने सांगितलं, की तिची सुपरवायजर तिला रोज एक हॉट अमेरिकानो आणि अंडी आणायला सांगत होती. तसंच बॉस तिला वारंवार पाण्याची बाटली भरून आणायला सांगत होता. त्यानंतर लू ने ऑफिस ग्रुपमध्ये या गोष्टी लिहून पाठवल्या. हे वाचल्यावर ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटरने तिलाच खडसावलं आणि तिला कोणतीही नोटीस आणि पगार न देता कामावरून काढून टाकलं.
या महिलेची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर लोकांनी कंपनीबद्दल संताप व्यक्त केला. लोकांनी कंपनीला ट्रोल केले, त्यानंतर कंपनीला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. कंपनीने एक स्टेटमेंट प्रसारित केले. लू हिच्या सुपरव्हायझरने अधिकाराचा गैरवापर केला आणि वैयक्तिक कामं सांगितली, असं त्यांनी लिहिलं. त्यानंतर सुपरव्हायझरला नोकरीवरून काढून टाकलं आणि लू हिला परत कामावर घेतलं. हे प्रकरण वादग्रस्त होतें सुपरव्हायजरने हा निर्णय घेतला होता; मात्र कंपनीची पॉलिसी अशी नाही असं कंपनीने सांगितलं.
एका रिपोर्टनुसार चीनमध्ये 64 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये वाईट वर्तणूक मिळते. यात चुकीची कामं करायला लावणं, शोषण करणं या गोष्टींचा समावेश आहे.