रॉबिननं त्याचा भयानक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने आणि त्याच्या पत्नीनं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील जे दृश्य पाहिलं त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडणारं कुणीच त्यांना दिसलं नाही. तो दरवाजा आपोआप उघडत होता. त्यांना धक्काच बसला. त्यानंतर फक्त त्या खोलीतच नव्हे घरात आणि घराच्या आसपासही विचित्र घटना घडताना त्यांनी पाहिल्या. त्यांच्या कारभोवतीही कुणीतरी फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलं.
advertisement
कोकणात एलियन्स? 20 हजार वर्षांपूर्वीचे पुरावे उलगडणार मोठं रहस्य
घरात आत्मा?
रॉबिन आणि त्याच्या पत्नीला घरात आत्मा असल्याचा संशय होता. रॉबिन म्हणाला की, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला एक वर्षापेक्षा जास्त काळ विचित्र घटनांबाबत संशय होता. त्यांनी त्यांच्या मृत आजी-आजोबांना आणि आईला मदतीसाठी दुसऱ्या जगातून बोलावलं. त्याच्या आईकडे आध्यात्मिक शक्ती होती. तिनं टोंगन संस्कृतीतील काही गोष्टींबाबत सांगितलं. त्यानंतर रॉबिनं आपल्या आजीआजोबांना आपल्या दुसऱ्या जगातून काळजी घेण्यास सांगितलं.
रॉबिन म्हणाला, फाहे एक वर्षाची होती, तेव्हा आम्हाला दुसरं मूल होणार असल्याचं समजलं. माझी पत्नी प्रेग्नंट होती. त्यावेळेस खूप त्रास झाला पण आता सर्वकाही सुरळीत आहे.
Death facts : मृत्यू जवळ येताच हे 3 शब्द बोलतो माणूस; नर्सने केला खुलासा
(सूचना : हा लेख बातमी म्हणून देण्यात आला आहे. यात करण्यात आलेल्या दाव्याचं समर्थन न्यूज18मराठी करत नाही. न्यूज18मराठीचा अंधश्रद्धांना प्रोत्साहन देण्याचा हेतू बिलकुल नाही.)