Death facts : मृत्यू जवळ येताच हे 3 शब्द बोलतो माणूस; नर्सने केला खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
मृत्यू जवळ आल्यावर किंवा मृत्यूआधी काय होतं, असा प्रश्न पडतोच. मृत्यूआधी काय संकेत मिळतात, याबाबत एका नर्सनेच खुलासा केला आहे. मरण समोर असताना बरेच लोक हे तीन शब्द बोलत असल्याचं तिनं सांगितलं.
नवी दिल्ली : या धरतीवर जो आला आहे, त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण तो कधी, कसा, कुठे हे कुणीच सांगू शकत नाही. मृत्यू कधी, कसा, कुणाला गाठेल माहिती नाही. पण मृत्यू जवळ आल्यावर किंवा मृत्यूआधी काय होतं, असा प्रश्न पडतोच. मृत्यूआधी काय संकेत मिळतात, याबाबत एका नर्सनेच खुलासा केला आहे.
अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये एका हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स ज्युली, जिनं सोशल मीडिया अकाऊंटवर मृत्यूबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मृत्यूआधीचे शेवटचे शब्द. ज्युलीने अनेक रुग्णांचा मृत्यू जवळून पाहिला आहे. त्यावरून शेवटच्या क्षणी लोक कोणते शब्द बोलतात हे तिनं सांगितलं आहे.
advertisement
मृत्यूआधी काय दिसतं?
ज्युलीनं सांगितल्यानुसार, जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा लोकांना फक्त काही गोष्टी आठवतात. मरणारे लोक आपल्या प्रिय व्यक्तीकडे पाहतात आणि चांगले काळ लक्षात ठेवतात. बहुतेक लोक त्यांच्या मृत प्रियजनांचे आत्मे पाहतात,काही लोकांना देवदूतही दिसतात. मृत लोकांचे आत्मे पाहून ते त्यांच्याकडे परत येत आहेत, असं सांगतात.
मृत्यूआधी काय होतं?
ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे, त्यांच्या श्वासोच्छवासाची पद्धत बदलू लागते. त्याच्या त्वचेचा रंगही बदलू लागतो. ही चिन्हं मृत्यूच्या काही तास आधी दिसतात.
advertisement
मृत्यूआधीचे शेवटचे 3 शब्द
मृत्यूच्या वेळी माणूस नेहमी सत्य बोलतो, असं म्हणतात. पण बहुतेकांचे शेवटचे शब्द कॉमन आहेत. मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असं ते म्हणतात. आईवडिलांना हाक मारल्यानंतर ते जग सोडून जातात.
advertisement
ज्युलीने यापूर्वी मृत्यूआधी घडणाऱ्या घटनांबाबतही सांगितलं होतं. मृत्यूआधी घडणाऱ्या 4 घटनांचा तिनं उल्लेख केला होता.
व्हिजिनिंग
ज्युलीने एका युट्युब व्हिडिओमध्ये सांगितलं की मृत्यू जवळ आलेली व्यक्ती आधी मृत्यू झालेल्या तिच्या प्रिय व्यक्तीला पाहते किंवा मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वी तिच्याशी बोलते.
टर्मिनल ॲसिडिटी
ज्युलीनं सांगितलं टर्मिनल ॲसिडिटी आमच्या सर्व रुग्णांपैकी 30 टक्के रुग्णांमध्ये आढळते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याआधी हा एक छोटासा ऊर्जेचा स्फोट आहे. जर कोणी खूप आजारी असेल, तर काही दिवस ऊर्जेचा स्फोट होतो आणि नंतर त्याचा मृत्यू होतो. काही रुग्णांसोबत असं का घडतं हे कोणालाही माहीत नाही. तरी ज्युली ही एक सामान्य रहस्यमय घटना मानते.
advertisement
द डेथ रिच
मृत्यूआधी त्या व्यक्तीला वाटतं की तो मृत्यूआधीच वर पोहोचला आहे आणि कुणाला तरी पाहत आहे, कुणालातरी धरून आहे किंवा मिठी मारत आहे.
द डेथ स्टेअर
ज्युली तिच्या व्हिडीओमध्ये सांगते की, कधी कधी एखादी व्यक्ती मरत असताना तिची नजर खोलीच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर किंवा एखाद्या भागावर असते. जणू तो टक लावून पाहतो. कधीकधी अशा परिस्थितीत लोक हसत असतात आणि त्याच वेळी त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीशी बोलत असतात, परंतु त्यांचे डोळे त्याच गोष्टीकडे टक लावून असतात. ‘मृत्यूकडे टक लावून पाहणं’ हे पूर्णपणे सामान्य आहे. रुग्ण आरामात आणि आनंदात आहे, हे दर्शवतं.
advertisement
Location :
Delhi
First Published :
May 20, 2024 1:10 PM IST