निगेल हंट (वय 59) ही ब्रिटनमधील व्यक्ती स्किल्ली बेटावर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेला होता. तिथेच एका लहान कोळ्याने त्याच्या पोटाला चावा घेतला. सुरुवातीला त्याला वाटलं मुंगी चावली आहे, त्यामुळे त्याने दुर्लक्ष केलं. तो दैनंदिन कामात व्यस्त झाला. कारण पोटाला फार मोठी जखम होईल, असं त्याला वाटलं नव्हतं. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, हंटला पोटावर ज्या ठिकाणी कोळी चावला होता तिथे एक मोठं छिद्र पडलं होतं, व तेथील मांस कुजलं होतं.
advertisement
बापरे! 6 महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात वाढत होती जुळी मुलं; पाहून डॉक्टरही शॉक
दुर्मिळ आजाराचं निदान
हंट काही दिवसांनी आजारी पडला. त्यानंतर त्याला तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे करण्यात आलेल्या मेडिकल टेस्टमध्ये त्यांना नेक्रोटायझिंग फॅसिटायटिस हा दुर्मिळ आजार असल्याचं समोरं आलं. या आजारामध्ये शरीरातील चरबी कुजते, त्वचेच्या जखमेवर बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. अखेर डॉक्टरांनी हंटच्या पोटावर ज्या ठिकाणी कोळी चावल्याने मोठं छिद्र पडलं होतं, तेथील चरबी काढून त्याचे प्राण वाचवले. याबाबत हंटने सांगितलं की, ‘जर मी तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो नसतो, तर माझा मृत्यू झाला असता. माझी पोटाची जखम अजून पूर्णपणे भरली नसून, ती रोज स्वच्छ करून ड्रेसिंग करावं लागतं.’
जेवताना अचानक आली उचकी आणि क्षणात गेला जीव, अशावेळी या गोष्टी करू नका
नेमकं काय घडलं होतं?
हंटने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर ही संपूर्ण घटना सांगितली आहे. तो म्हणाला, ‘मी जेव्हा विमानतळावर पोहोचलो, त्यावेळी तिथे चेक-इन केलं व इच्छित स्थळाकडे निघालो. पण जेव्हा इच्छित स्थळी पोहोचलो, तिथे मला आजारी असल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळे मी काही अँटिबायोटिक्स घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेलो. तसेच दुसऱ्या दिवशी औषधांसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असल्याने ते घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो. पुढील दोन दिवस तब्येत आणखी खराब झाल्यानं हाडाबा येथील एका हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे माझी ब्लड टेस्ट करण्यात आली. अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की, तुम्ही वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचलात, हे बरं झालं. अन्यथा कोळी चावल्यामुळे तुमचा मृत्यू झाला असता.’