नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टारसारख्या ओटीटी चॅनल्सवर वेबसीरिज, सिनेमा पाहणं तुम्हाला आवडतं का? कधीही मोकळा वेळ मिळाला, की तुम्ही हे ओटीटी प्लॅटफॉर्म्स पाहता का? या ओटीटी चॅनेल्ससाठी दर महिन्याला तुम्ही पैसे भरता का? अशा वेळी कधी कधी महिन्याचे पैसे भरले पण कंटेंट बघायला वेळ नाही अशी वेळही तुमच्यावर येतच असेल. तुमचं सबस्क्रिप्शन ऑटो-रिन्यू होत असेल तर अशा वेळी तुमचे पैसे वाया जाऊ शकतात. त्यामुळे सबस्क्रिप्शन ऑटो-रिन्यू न होऊ देणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे.
advertisement
नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टारचं ऑटो पेमेंट करण्याचा पर्याय निवडला नसेल तर तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही. ऑटो पेमेंटचा पर्याय नसेल तर तुम्ही जेव्हा पैसे भराल तेव्हाच तुम्हाला ही चॅनेल्स बघता येतील. तसं केल्यामुळे तुमचे पैसेही वाया जाणार नाहीत. हा पर्याय निवडण्यासाठी पुढच्या पायऱ्या लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे कृती करा. सगळ्यात आधी नेटफ्लिक्स आणि डिस्ने हॉटस्टार अकाउंटला लॉग इन करा. आता प्रोफाइलमध्ये जाऊन सबस्क्रिप्शन किंवा अकाउंट हा पर्याय निवडा. आता ऑटो-रिन्यू ऑप्शन बंद करा. त्यामुळे पुढच्या वेळी तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कापले जाणार नाहीत. सबस्क्रिप्शन कॅन्सल करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा. आता मॅनेज सबस्क्रिप्शन या पर्यायावर क्लिक करा. आता कॅन्सल सबस्क्रिप्शन हा पर्याय निवडा. तुमच्या सबस्क्रिप्शनची व्हॅलिडिटी संपेपर्यंत तुम्ही कंटेंट बघू शकता.
तुम्ही बॅंक खात्यात अलर्ट सेट करू शकता. त्यामुळे तुम्हाला नको असलेले व्यवहार टाळणं शक्य होईल. क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहिती देऊ नका. त्यामुळे कोणत्याही सबस्क्रिप्शनसाठी पैसे आपोआप कट होणार नाहीत.