रिक्षाच्या समोरच्या हेडलाईमधून नाग समोर आल्याचा प्रकार समोर आलाय. भलामोठा नाग पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. शाळेतील लहान मुलेही हे दृश्य आश्चर्यानं पाहत होती. नाग रागात हल्ला करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रिक्षासमोर हेडलाईटसारखा भलामोठा नाग निघाला. त्यानी मोठी फना काढली असून तो हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. अशा स्थितीत जो कोणी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तो त्याच्यावर हल्ला करतोय. नाग ऑटोच्या नंबर प्लेटला फणा पसरवून चिकटून आहे आणि व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला चावण्याचा प्रयत्न करतोय. सापाला पाहण्यासाठी शाळकरी मुलांची गर्दी जमली आहे हे बघायला मिळतं.
advertisement
d_shrestha10 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसतोय.
दरम्यान, सोशल मीडियावर अशा धोकादायक प्राण्यांचे व्हिडीओ कायमच व्हायरल झालेले पहायला मिळतात. असे व्हिडीओ कमी वेळात चर्चेचा विषय ठरतात. सापांना हाकलून देण्याचा प्रयत्न करूनही ते घराबाहेर पडले नाहीत, तर लोक त्यांना ठार मारण्यास भाग पाडतात किंवा वनविभागाला कळवतात.