TRENDING:

अहो! कोणतं घेऊ? बायकोने 2 वस्तूंपैकी एक निवडायला सांगितलं तर काय करायचं? हे घ्या उत्तर

Last Updated:

Couple Video Viral : जेव्हा तुमची पत्नी तुम्हाला दोन गोष्टींपैकी एक निवडण्यास सांगेल तेव्हा काय करावं? हे व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे. यावर भन्नाट असा उपाय देण्यात आला आहे, जो लोकांना आवडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याला दोन गोष्टींपैकी एकाची निवड करायला सांगते. तिला साडी नेसायची असेल तर कोणती साडी नेसू असं विचारते, ड्रेस घालायचा असेल तर कोणता घालू असं विचारते. कुठे शॉपिंगला गेले तर दोन वस्तूंपैकी एकाची निवड करायला सांगते. असं चित्र कित्येक घरांमध्ये तुम्हाला दिसेल. यानंतर नेमकं उत्तर काय द्यायचं असा प्रश्न नवऱ्यांसमोर असतो. आता यावर भन्नाट असा उपाय सापडला आहे.
News18
News18
advertisement

बायकोने दोन वस्तूंची निवड करायला सांगितली तर नवऱ्याने पसंत केलेलीच गोष्ट निवडणाऱ्या बायका क्वचितच असतील. नवऱ्यांना विचारलं तरी बायका त्यांना हवी ती वस्तू निवडतात किंवा आपल्याला पसंत असलेली वस्तू का निवडली नाही, असं म्हणत नवऱ्यावर चिडतात. मग नेमकं करायचं काय? असा प्रश्न नवऱ्यांना पडतो. अशाच एका नवऱ्याने यावर उपाय शोधून काढला आहे. ज्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने इतरांसोबतही शेअर केला आहे. आता हा उपाय नेमका काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता कित्येक नवऱ्यांना असेल.

advertisement

देवाकडे हवं ते माग! गर्लफ्रेंडने मागितलं असं काही, ऐकून बॉयफ्रेंडच्या चेहऱ्याचा रंगच उडाला

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला पर्स खरेदी करते आहे. तिच्या हातात दोन पर्स आहेत. ती दोन्ही पर्स आपल्या पतीला दाखवते आणि त्याला विचारते कोणती चांगली आहे, कोणती घेऊ? पती काहीतरी विचार करत असल्याचं आणि घाबरलेला दाखवला आहे. त्याच व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये एक आवाज ऐकू येतो. तुम्ही देखील अनेकदा अशा परिस्थितीत अडकले असाल. अशा परिस्थितीत तुम्हाला फक्त पाच सेकंद शांत उभं राहावं लागतं. तिला जे आवडते ते ती स्वतः सांगते.

advertisement

यानंतर व्हिडिओमध्ये ती महिला स्वतः म्हणते, ही चांगली आहे ना? यावर तिचा नवराही आनंदाने त्याच पर्सकडे बोट दाखवू लागतो. मग आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये हास्याचा आवाज ऐकू येतो आणि नवरा सुटकेचा नि:श्वास सोडताना दिसतो.

मृत गर्लफ्रेंडचा मोबाईल वापरत होता बॉयफ्रेंड, 8 महिन्यांनंतर सापडला मृतदेह

व्हिडिओमध्ये असंही सूचित केलं आहे की जर महिला दोन गोष्टींपैकी एक विचारत असेल तर पतीने एक गोष्ट निवडून उत्तर दिलं तर ते धोकादायक ठरू शकतं. बरेच लोक म्हणतात की अशा प्रसंगी पत्नी पतीशी वाद घालू शकते किंवा पतीच्या निवडीला थेट नकार देऊ शकते. परंतु अशा शंका टाळण्यासाठी व्हिडिओमध्ये हा उपाय करण्यात आला आहे, ज्यामुळे व्हिडिओ मजेदार बनला आहे.

advertisement

हा व्हिडिओ मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे. एका युझरने कमेंट केली आहे की, "मीही असंच करतो, भावाने सर्वांना ही आयडिया सांगितली." दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, "किती सोपा उपाय आहे." तिसऱ्याने लिहिलं आहे की, "भाऊ मदत केल्याबद्दल धन्यवाद." तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाल आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या/Viral/
अहो! कोणतं घेऊ? बायकोने 2 वस्तूंपैकी एक निवडायला सांगितलं तर काय करायचं? हे घ्या उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल