असं अनेकदा घडतं की प्रवाशांना रेल्वेचे नियम माहित नसतात, ज्यामुळे ते या गोष्टींमध्ये अडकतात किंवा अपूऱ्या माहितीमुळे त्यांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करताना त्याचे नियम माहित असणं प्रवाशांसाठी गरजेचं आहे.
आता साध्या तिकीटाच्या नियमाबद्दल बोलायचं झालं तर जनरलची तिकिट घेऊ प्रवाशी स्लिपर किंवा रिझर्वेशनमध्ये चढू शकणार नाही हा रेल्वेचा नियम आहे, त्याच प्रमाणे स्लिपरचं तिकिट घेऊन प्रवासी एसी कोचमध्ये जाऊ शकणार नाही. तसेच थ्री टायर, 2 टायर एसी डब्यांचे देखील नियम आहेत. हे नियम जर तोडले तर टीटी दंड आकारतो.
advertisement
पण तुम्हाला माहितीय आता तुम्ही स्लीपरची तिकिट घेऊन 3AC मध्ये प्रवेश करु शकता आणि त्यासाठी टीटी तुम्हाला दंड ही आकारणार नाही. आता तुम्हाला नक्कीच याबद्दल आणखी जाणून घेण्याची इच्छा झाली असेल आणि हे कसं शक्य आहे? त्याचे नियम काय हे देखील माहित करून घ्यायचं असेल. चला जाणून घेऊ
जर तुम्हीही नेहमी ट्रेनने प्रवास करत असाल, तर भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही ‘ऑटो अपग्रेडेशन’ सुविधा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या सुविधेमुळे तुम्ही स्लीपर क्लासचं तिकीट बुक केलं असलं, तरी थेट थर्ड AC मध्ये प्रवास करू शकता, तेही कोणताही अतिरिक्त चार्ज न देता.
ही सुविधा नेमकी कशी काम करते?
भारतीय रेल्वेच्या IRCTC वेबसाइट किंवा अॅपवरून जेव्हा तुम्ही तुमचं तिकीट बुक करता, तेव्हा एक “Consider for Auto Upgradation” असा पर्याय दिसतो. तो नक्की सिलेक्ट करा.
जर तुमचं तिकीट स्लीपर क्लासमध्ये वेटिंग किंवा RAC मध्ये असेल आणि ट्रेनमध्ये थर्ड AC कोचमध्ये जागा रिकामी असेल, तर चार्ट तयार करताना सिस्टम आपोआप तुमचं तिकीट अपग्रेड करून थर्ड AC मध्ये जागा देईल.
आता प्रश्न असा की यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागतं का? तर उत्तर आहे नाही ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. तुम्हाला कोणताही अतिरिक्त चार्ज द्यावा लागत नाही.
तुमचं PNR नंबर तेच राहतं, फक्त कोच आणि सीट नंबर वेगळा होतो. काही वेळा थर्ड AC किंवा सेकंड AC चे प्रवासीही फर्स्ट AC मध्ये अपग्रेड होऊ शकतात. अर्थात, जागा रिकामी असल्यास.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
ही सुविधा रेल्वे कोट्याच्या तिकिटांवर लागू होत नाही (जसे की MP कोटा, ऑफिसियल कोटा वगैरे. हे अपग्रेडेशन फक्त रिक्त जागा उपलब्ध असतील तरच होईल. जर तुम्हाला ही संधी मिळाली, तर वेटिंग लिस्टमधील प्रवाशांनाही कन्फर्म जागा मिळण्याची शक्यता वाढते.
रेल्वेने ही सुविधा का सुरू केली?
रेल्वेच्या मते, अनेकदा इतर कोचमध्ये सीट खाली रहातात, अशावेळी प्रवाशांचा फायदा व्हावा आणि त्यांना या सुविधेचा लाभ घेता यावा यामुळे कोच देखील पूर्ण क्षमतेने वापरता येतात. आता पुढच्यावेळी तिकीट बुक करताना “Consider for Auto Upgradation” ऑप्शन सिलेक्ट करायला विसरु नका.