असंच एक प्रकरण नुकतंच 'मेला स्पेशल ट्रेन' मध्ये घडलं, जिथे एका प्रवाशाच्या बॅगेत लपवलेली 'पाण्याच्या बाटली'मागे हे गुन्हा घडत होता. जे पोलिसांनी पकडलं.
नक्की काय घडलं?
शुक्रवारी सकाळी एक साधा प्रवासी ट्रेनने प्रवास करत होता. पण त्याच्याकडे एक संशयास्पद बॅग होती. त्यामधून आलेल्या आवाजामुळे तो प्रवासी पकडला गेला.
शुक्रवारी एका प्रवाशाने मेला स्पेशल ट्रेनमध्ये चढताच, त्याच्या बॅगेतून एक आवाज आला. ज्यामुळे रेल्वे पोलिसांना थोडा संशय आला. त्यांनी बॅगेत काय आहे? असं व्यक्तीला विचारलं असता. महागडं सामान आहे असं उत्तर मिळालं, पण तपासणी दरम्यान GRP नी त्याची बॅग उघडली आणि त्यांना त्या बॅगेत पाण्याच्या बाटल्या आढळल्या. पण त्या बाटलीच्या आत होती धक्कादायक गोष्ट. खरंतर त्या बॅगेतील बाटल्यांमध्ये पाण्याच्या जागी होती अवैध दारू.
advertisement
किती होती दारूची किंमत?
मिळालेल्या माहितीनुसार, त्या दारूच्या बाटल्यांची एकूण किंमत सुमारे 37,950 टका होती. ही मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्याचा प्रयत्न असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव रोहित कुमार असून तो बिहारमधील गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या लाला जी टोला परिसरातला रहिवासी आहे. तो प्रयागराजहून ट्रेनमध्ये चढला होता.
यावेळी मेहताब खान आणि प्रदीप पाल हे रेल्वे पोलीस ड्युटीवर होते. त्यांनी वेळेवर कारवाई करत आरोपीला अटक केली आणि पुढील तपासासाठी त्याला ताब्यात घेतलं.
ही घटना दाखवते की आपण ट्रेनने किंवा सार्वजनिक ठिकाणी किती सतर्क राहाण्याची गरज आहे. कारण सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमधूनही गुन्हा होऊ शकतो.