लँडी पर्राग गोयबुरो असं या सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरचं नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे 1 लाख 73 हजार फॉलोअर्स आहेत. 23 वर्षांची लँडी अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये राहत होती. तिनं 2022 च्या मिस इक्वाडोर स्पर्धेत लॉस रिओस प्रांताचं प्रतिनिधित्व केलं.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, लँडी एका लग्नात सहभागी होण्यासाठी इक्वेडोरच्या क्वेडो शहरात गेली होती. तिथंच इन्स्टाग्राम पोस्ट करताना तिनं एक चूक केली आणि तिचा जीव गेला.
advertisement
'गुलाबी साडी...' गाणं तर ट्रेंड झालं, पण हाच रंगच का? महिलांशी 'या' कारणामुळे लावला जातो संबंध
नेमकं काय घडलं?
लँडीचा मृत्यू झाला तेव्हा ती एका रेस्टॉरंटमध्ये होती. तिच्यासोबत नेमकं काय घडलं ते रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
व्हिडिओ फुटेजमध्ये लँडी रेस्टॉरंटमध्ये कुणासोबत तरी बसून जेवत होती. जेवता जेवता ती बोलत होती. त्यानंतर अचानक दोन अज्ञात व्यक्ती तिथं घुसल्या. त्यांच्या हातात शस्त्र होती. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. लँडीनं लपून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. गोळीबारात तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर रेस्टॉरंटमधून पळून गेले. लँडीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमुळे गेला जीव
हत्येपूर्वी लँडीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रेस्टॉरंटच्या लोकेशनसह तिचा फोटो पोस्ट केला होता. फोटोसह पोस्ट केलेले लोकेशन पाहून हल्लेखोर लँडी हत्या करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्याचा पोलिसांना संशय आहे. ही हत्या का करण्यात आली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या प्रकरणाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.