पॉल जॉन सिंगल माल्ट मिथुनाची चव जरा वेगळी आहे. खास अनुभवाची अपेक्षा असणाऱ्या व्हिस्की प्रेमींसाठी हा उत्तम पर्याय आहे. ही व्हिस्की खूप अचूकपणे तयार केली जाते. मुंबईत या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 22,000 रुपये आहे.
एक समृद्ध सिंगल माल्ट आणि कलात्मक पद्धतीनं बनवली जाणारी पॉल जॉन सिंगल माल्ट ओलोरोसो म्हणजे व्हिस्कीत खास शोधणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. मुंबईत या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 13,000 रुपये आहे.
advertisement
जगातील सर्वात खोल गुहा, 3 बुर्ज खलिफा बसू शकतील इतकी खोल, जातानाही वाटते भीती!
फ्लेव्हर्सचं आकर्षक मिश्रण असलेली पॉल जॉन सिंगल माल्ट पेड्रो झिमेनेझ या व्हिस्कीत तिची अस्सल उत्पादन प्रक्रिया प्रतिबिंबित होते. तिचं हे वैशिष्ट्य व्हिस्की प्रेमींसाठी खास पर्याय ठरतं. मुंबईत या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 13,000 रुपये आहे.
रॅडिको खेतानची रामपूर इंडियन सिंगल माल्ट तिच्या वैशिष्टपूर्ण चवीसाठी ओळखली जाते. ही अशी व्हिस्की आहे, जिने आपल्या आयुष्यातला दोन तृतीयांश कालावधी अमेरिकी ओक बोरबॉन बॅरल्समध्ये आणि दुसरा तृतीयांश युरोपियन ओक शेरी बॅरल्समध्ये घालवलेला असतो. दिल्लीत या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 12,500 रुपये आहे.
क्रेझी कॉक ही साउथ सीज डिस्टिलरीजचं एक समृद्ध असं उत्पादन आहे. ती इंपोर्टेड बोरबॉन आणि शेरी बॅरलमध्ये ठेवली जाते. त्यानंतर मास्टर ब्लेंडरच्या मदतीने पूर्णपणे संतुलित व्हिस्कीपासून तयार केली जाते. मुंबईत या व्हिस्कीच्या 750 मिलीच्या एका बाटलीची किंमत 12,500 रुपये आहे.
अमृत एक्सक्लुझिव्ह एडिशन हा ब्रँड गुणवत्तेच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणावा लागेल. भारतीय सिंगल माल्टच्या शोधात असणाऱ्या व्हिस्की प्रेमींसाठी हा एक चांगला पर्याय आहे. मुंबईत या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 9900 रुपये आहे.
एक परिपूर्ण आणि उत्कृष्ट सिंगल माल्ट व्हिस्की दोन इंपोर्टेड ओक बोरबॉन आणि शेरी बॅरलमध्ये परिपक्व केली जाते. या व्हिस्कीची चव थोडी गोड असते. त्यामुळे तिचा अनुभव आनंददायी ठरतो. मुंबईत या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 8900 रुपये आहे.
चव आणि किफायतशीरपणा अशा दोन्ही गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेली पॉल जॉन ब्रिलियन्स सिंगल माल्ट वाजवी दरात गुणवत्ता अपेक्षित असलेल्या व्हिस्की प्रेमींसाठी चांगला पर्याय आहे. मुंबईत या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 6000 रुपये आहे.