जगातील सर्वात खोल गुहा, 3 बुर्ज खलिफा बसू शकतील इतकी खोल, जातानाही वाटते भीती!

Last Updated:

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांच्याबद्दल जाणून आश्चर्य वाटतं. अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांची रहस्यं अद्याप उलगडलेली नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणचं गूढ अनेक दशकांनंतर उकलण्यात यश आलं.

जगातील सर्वात खोल गुहा
जगातील सर्वात खोल गुहा
नवी दिल्ली : जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांच्याबद्दल जाणून आश्चर्य वाटतं. अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांची रहस्यं अद्याप उलगडलेली नाहीत. त्याचबरोबर अनेक ठिकाणचं गूढ अनेक दशकांनंतर उकलण्यात यश आलं. असंच एक ठिकाण म्हणजे अब्खाझियातल्या गागरा पर्वतरांगांतली वेरीओव्किना गुहा होय. ही गुहा इतकी खोल आहे, की यात बुर्ज खलिफासारख्या सुमारे 3 इमारती सामावू शकतात. एवढंच नाही तर लंडनमधल्या शार्डसारख्या 7 इमारती या गुहेत मावतील. याच्या तळापर्यंत जाण्यासाठी 50 वर्षांहून अधिक वर्षं लागली.
अब्खाझियामधल्या गागरा पर्वतरांगेत आढळणारी वेरीओव्किना गुहा हा रशिया समर्थित प्रदेश आहे. एके काळी यावर जॉर्जियाचं राज्य होतं. हे क्षेत्र जमिनीत 7293 फुटांपर्यंत पसरलं आहे. या रशियन गुहेच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी 30 हून अधिक वेळा प्रयत्न केले गेले. त्यासाठी एकूण 50 वर्षांहून अधिक काळ लागला. त्याच्या तळाशी पोहोचूनही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की तिथे अजून बरंच काही शोधायचं आहे.
advertisement
गुहेचं प्रवेशद्वार दोन पर्वतांच्या मध्ये आहे. ते फोर्ट्रेस व अम्ब्रेला म्हणून ओळखले जातात. त्याच्या आत जाणं आणि त्याचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करणं धोकादायक आहे. 2018मध्ये अशीच एक भयानक घटना उघडकीस आली होती, जेव्हा त्याच्या आत तळाशी गेलेली एक टीम अचानक आलेल्या पुरात बुडाली. या भयानक घटनेचे साक्षीदार असलेले नॅशनल जिओग्राफिकचे गुहा फोटोग्राफर रॉबी शॉन यांनी तो प्रसंग सांगितला होता. गुहेच्या आतल्या एका छिद्रातून पाणी येऊ लागलं आणि आम्ही तिकडे बघतच राहिलो. तिथे बांधलेल्या आमच्या घरात पूर्ण पाणी शिरलं. तो आवाज मी कधीच विसरू शकत नाही.
advertisement
हजारो फूट दोरीवर चढून पाणी आणि चिखलातून जड सामान घेऊन रांगत गुहेच्या तळापर्यंत पोहोचायला चार दिवस लागले होते, असं रॉबी शॉन यांनी सांगितलं. ते म्हणाले, की व्हेरिओव्किना गुहा युनायटेड स्टेट्समधल्या केंटुकी गुहांपेक्षा खूपच वेगळी आहे. इथे गुहेतल्या माणसाचा अकल्पनीय मृत्यू झाला. खडकांमध्ये अडकून तो तासन्तास मदतीसाठी ओरडत होता. त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला; पण त्याचा मृत्यू झाला, कारण खडकांमध्ये दबून गंभीर जखमी होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
advertisement
विल्यम जे कफलिन असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो सहा फूट उंच होता. गुहेत प्रवेश करण्याच्या अनुषंगाने विचार केल्यास त्याचं शरीर खूप मोठं होतं; तरीही गुहेत प्रवेश करण्यात तो यशस्वी झाला. परंतु बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना तो बोगद्यात अडकला. त्यानंतर तो चढत असलेल्या जिन्यावरून घसरला आणि खाली पडला आणि खडकात अडकला. यात तो गंभीर जखमी झाला. नंतर 7 तासांच्या प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आलं; मात्र गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या/Viral/
जगातील सर्वात खोल गुहा, 3 बुर्ज खलिफा बसू शकतील इतकी खोल, जातानाही वाटते भीती!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement