Actress Life: 20 व्या वर्षी आई बनलेली ही अभिनेत्री; अंडरवर्ल्डच्या धमक्यानंतर पतीसोबत सोडावा लागला देश
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Actress Life: आजकाल अभिनेत्री करिअरला आधी प्राधान्य देतात मग आई बनण्याचा विचार करतात. मात्र अशी एक अभिनेत्री जी 20 व्या वर्षीच आई बनली.
मुंबई : आजकाल अभिनेत्री करिअरला आधी प्राधान्य देतात मग आई बनण्याचा विचार करतात. मात्र अशी एक अभिनेत्री जी 20 व्या वर्षीच आई बनली. 90 च्या दशकातील ही अभिनेत्री अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री कोण? तिच्याविषयी जाणून घेऊया.
बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकात ‘त्रिदेव’ आणि ‘विश्वात्मा’ सारख्या हिट चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनम खान आता पडद्यापासून दूर असली तरी ती नेहमी चर्चेत असते.
अलीकडेच सोनमने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत तिचा मुलगा गौरवच्या जन्माच्या आठवणी शेअर केल्या. सोनम म्हणाली, “मी केवळ 20 वर्षांची असताना आई झाले. हा फोटो गौरवच्या जन्माच्या दिवसाचा आहे. त्या क्षणीच मला जाणवलं की माझा मुलगा खूप खास आहे. त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे.”
advertisement
सोनमने 1991 मध्ये दिग्दर्शक राजीव राय यांच्याशी लग्न केले होते. लग्नानंतर तिने हिंदू धर्म स्वीकारला. 1992 मध्ये गौरवचा जन्म झाला. पण लहान वयातच त्याला ऑटिझम असल्याचे निदान झाले. सोनमसाठी ही काळजी आणि जबाबदारीची नवी सुरुवात होती. दरम्यान, 1997 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमकडून राजीव रायवर हल्ला झाला. त्यानंतर हे जोडपं भारत सोडून परदेशात स्थायिक झालं. काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
advertisement
advertisement
सोनमने नंतर गौरवला एकटीने वाढवले. 2017 मध्ये तिच्या आयुष्यात मुरली आले. दोघांची पहिली भेट पुद्दुचेरीमध्ये झाली. मैत्री प्रेमात बदलली आणि उटीमध्ये त्यांनी लग्न केले. गौरवही या लग्नाला हजर होता आणि त्याने आईच्या निर्णयाचं मनापासून स्वागत केलं. सोनमने 2024 मध्ये या दुसऱ्या लग्नाची माहिती चाहत्यांना दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 7:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Actress Life: 20 व्या वर्षी आई बनलेली ही अभिनेत्री; अंडरवर्ल्डच्या धमक्यानंतर पतीसोबत सोडावा लागला देश