Numerology: शुक्रवारी लक्ष्मीची कृपा होणार! आर्थिक कामांना गती, फायद्यात येणार या 3 मूलांकाचे लोक

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज शुक्रवारी काही अडचणी अचानक समोर येतील, पण भावंडांशी ताणलेले नातेसंबंध सुधारू लागतील. इतरांसाठी सहानुभूतीच्या मूडमध्ये असाल. रोमँटिक असाल. विरोधकांपासून सतर्क राहा. खर्च वाढल्यानं गरजा भागवणे अवघड होऊ शकते. रोमान्ससाठी दिवस चांगला आहे. कोणताही संकोच न करता प्रेम व्यक्त करा.
Lucky Number : 17
Lucky Colour : Light Grey
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
कामाचा दिवस असल्यानं गोंधळ वाढेल, जवळच्या मित्राशी तुमचं नातं चांगलं असेल. मनोरंजनाला प्राधान्य द्याल. आरोग्याची काळजी घ्या. नशिबाची साथ कामात मिळेल. त्यामुळे बचत करू शकाल. तसंच अतिरिक्त पैसे कमावता येतील. दिवसभरातील धावपळ आणि तणाव कमी करण्यासाठी जोडीदारासोबत चर्चा करा. कामांना गती मिळेल.
Lucky Number : 9
Lucky Colour : Dark Yellow
advertisement
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
शुक्रवारी कामात काळजी घ्या, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. पण, तुम्ही आनंदी असाल. कोणतीही गोष्ट तुम्हाला मागे खेचणार नाही. ताप जाणवू शकतो. त्यामुळे सतर्क राहा आणि काळजी घ्या. नोकरीची नवीन आणि चांगली संधी मिळू शकते. तुम्ही जोडीदारासोबत हळवे क्षण शेअर कराल. या क्षणांमुळे आयुष्य खास बनेल.
advertisement
Lucky Number : 2
Lucky Colour : Yellow
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
नवीन काहीतरी करण्यासाठी मार्ग शोधाल. दिवस मौजमजेचा असल्याने पुरेपूर आनंद घ्या. पण कामात हुशारी कायम ठेवावी लागेल. महत्त्वाची गोष्ट आपण गमावत नाही ना याची खात्री करा. विविध स्रोतांमधून पैसा मिळेल. प्रेमजीवनात एखादं रोमँटिक सरप्राइज मिळू शकतं.
advertisement
Lucky Number : 6
Lucky Colour : Baby Pink
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
कंटाळा आलेला असताना कामात लक्ष लागत नाही, कुटुंबासह सहलीला गेल्यास नातं अधिक घट्ट होईल. मुलांमुळे घरात आनंद असेल. तुम्हाला मुलांचा अभिमान वाटेल. दिवसभर डोकेदुखी आणि ताप जाणवू शकतो. प्रयत्न केल्यास नफा मिळू शकतो. तुम्ही भरपूर पैसेदेखील कमावू शकाल. रोमान्ससाठी दिवस चांगला आहे. त्यामुळे त्याचा आनंद घ्या.
Lucky Number : 5
advertisement
Lucky Colour : Dark Green
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
उदास वाटू शकतं, भावंडांसोबतच्या नात्यात आनंद मिळेल. आज शुक्रवारी आरोग्य फारसं अनुकूल नसेल. तरीदेखील तुम्ही अथकपणे काम कराल. धर्मादाय संस्था किंवा गरजू व्यक्तीला मदत कराल. कुटुंबातील लोकांची मनःस्थिती फारशी चांगली नसेल. त्यामुळे तुम्ही जोडीदाराला प्रेम द्या आणि जोडीदाराची काळजी घ्या.
Lucky Number : 4
Lucky Colour : Turquoise
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
नियम मोडू नका, काळ खराब असल्यानं कायदेशीर कारवाई होऊ शकते. बाकी दिवस मौजमजेचा आहे. त्याचा पुरेपूर आनंद घ्या. वडिलोपार्जित कोणत्याही गोष्टीसाठी पाठपुरावा टाळा. आर्थिक स्थिती चांगली असेल. बुध ग्रहामुळे तुम्ही कर्ज परतफेड करू शकाल. मनातील प्रश्न सुटतील.
Lucky Number : 15
Lucky Colour : Parrot Green
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
साध्या गोष्टीसाठी भावंडांकडून मदत मिळणार नाही. कामात तुम्ही उत्साही असाल. खबरदारी घ्या अन्यथा जमीन किंवा मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. धर्मादाय संस्थेला मदत कराल. जोडीदार तुमच्याशी फारसा सहमत नसेल. मनातल्या काल्पनिक गोष्टींमधील तथ्य शोधा.
Lucky Number : 3
Lucky Colour : Dark Yellow
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज शुक्रवारी कौटुंबिक आनंद मिळेल. दिवसभर अनिश्चितता जाणवेल तरीही आर्थिक चिंता नसेल. आरोग्य चांगलं राहील. व्यवसायात एक पाऊल पुढे जाल. नुकत्याच भेटलेल्या व्यक्तीसह डेटवर जाण्यापूर्वी दोन वेळा विचार करा आणि मगच निर्णय घ्या.
Lucky Number : 22
Lucky Colour : Violet
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: शुक्रवारी लक्ष्मीची कृपा होणार! आर्थिक कामांना गती, फायद्यात येणार या 3 मूलांकाचे लोक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement