Viral Video : अयोध्येतील कावळाही करतोय राम नामाचा जप, Video पाहून व्हाल अवाक्
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. रामलल्लाची स्थापना झाली आणि अयोध्याच नाही तर संपूर्ण देशच प्रभू रामाच्या दर्शनानं मंत्रमुग्ध झाला. राम आल्याचा आनंद माणसंच नाही तर पशू-पक्षांमध्ये पहायला मिळाला.
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. रामलल्लाची स्थापना झाली आणि अयोध्याच नाही तर संपूर्ण देशच प्रभू रामाच्या दर्शनानं मंत्रमुग्ध झाला. राम आल्याचा आनंद माणसंच नाही तर पशू-पक्षांमध्ये पहायला मिळाला. अशातच अयोध्येतील एक कावळा सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. जो अयोध्येतील रेल्वे स्टेशनवर सतत 'राम-राम' म्हणत आहे. या कावळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
कावळ्याचा राम राम म्हणताना व्हिडीओ व्हायरल होताच अनेकजणांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. कावळ्याला राम जप करताना पाहून लोकांनी त्याला कागभुसुंडीजींचा अवतार म्हटलं आहे. मात्र हा व्हिडीओ किती खरा आहे हे माहित नाही. मात्र सध्या हा व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधतोय मात्र हे नक्की.
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अयोध्येतील कावळा सर्वांचंच लक्ष वेधत होता. असाच एका रामभक्ताचंही त्यानं लक्ष वेधलं आणि या व्यक्तीनं त्याचा व्हिडीओ काढला. अयोध्येतील रेल्वे स्टेशनवर हा कावळा सतत राम राम म्हणताना लोकांना आढळतोय. या व्यक्तीनं त्याचा व्हिडीओ काढलाय. व्यक्ती जसा राम म्हणेल तसा कावळाही राम म्हणताना आढळून आला.
advertisement
अयोध्या धाम रेलवे स्टेशन में एक कौआ आजकल चर्चा का विषय बन गया है। उसके द्वारा बहुत स्पष्ट राम राम बोलने के कारण दक्षिण भारत से आए एक रामभक्त का ध्यान उस पर गया और उन्होंने वीडियो बना डाला। आप भी उन साक्षात कागभुशुण्डि जी के दर्शन करें। जय श्रीराम, जय जय श्रीराम* pic.twitter.com/FUNY8SX2Y3
— Satish Chandra Misra (@mishra_satish) February 5, 2024
advertisement
@mishra_satish नावाच्या X अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 1 मिनिट 28 सेकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडवत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी व्हिडीओवर कमेंट केल्या असून अनेकांनी व्हिडीओला शेअर केलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 07, 2024 10:54 PM IST